न ये मी बाई ! पुनरपि या संसारा

(चालः अरे हरि ! प्यालो मी...)
न ये मी बाई ! पुनरपि या संसारा ।
पुरे हा चौर्यांशी - फेरा ।।धृ०॥
प्रपंच - घरधनी, असत्य करि करणी ।
जळो ही अहंकार - वाणी ।।
सासु कल्पना, ती फिरे रानोराना ।
दीर ते कामक्रोध जाणा ।।
तुकड्यादास मागे प्रेम - पान्हा ।
येऊ द्या आडकुजी ! ध्याना ।।
त्रासी बहु झालो , द्या चरणी थारा।
पुरे  हा  चौऱ्यांशी - फेरा ॥१॥