माझ्या जीवीच्या जीवना ! घे करुणा
( चाल : मेरे गमके सहारे आजा . .)
माझ्या जीवीच्या जीवना ! घे करुणा यदुनंदना ।
आले संकट निवारी, तारी बालका तारी ॥धृ०॥
मन चंचल झाले, आवरी ना काही ।
धाव घे विषयमार्गे, नच साधनि स्थिर राही ।
कैसा द्यावा या लगाम ? यासी पावाया आराम,
याने सुध - बुध हरली सारी ॥१॥
जरी योगयाग केले तीर्थाटनि जाउनी ।
मंदिरी ध्यान धरिले, मन स्थीर होड म्हणनी ।
तरि क्रोध ये बेफाम, न घे देवाजीचे नाम,
काय करु यासि सांगना हरी ! ।।२।।
काय साधन करु पुढती, मन स्थीर रहायासी ?
सोडुनी कुसंगति ही, राहण्या तव पायासी ।
हेचि मागे तुकड्यादास, यासी करु नको उदास,
तुझी कीर्ति पुराणांतरी ॥३॥