काय कुणा सांगता आपुले, ज्ञान - पाठ सारे ?

(चाल: कसा निभवशी काळ..)
काय कुणा सांगता आपुले, ज्ञान - पाठ सारे ?
कोणि न दुसरा भासतसे, हे   भासरुप - वारे ।।धृ०।।
ज्ञानाचे वेगळा प्रभू तो, न कळे   ज्ञानाने l
निवृत्ती झालिया कळे मन, स्थीर    करा   कर्मे ।।१।।
शब्द-ज्ञान सर्वही व्यर्थ, झालिया नफा नाही ।
अनुभव तो घ्या कळुनि आवडी, आपरुप पाही ।।२॥
तुकड्यादासहि आस धरुनिया, भजतो श्रीगुरुला ।
विचित्र लीला तया गुरुची, न   कळे   आम्हाला ।l३॥