बुद्धिचिये वर्म वाढले जगती ।

बुद्धिचिये  वर्म वाढले जगती । 
जाहली महती दिसंदीस ॥धृ॥
सृष्टि विकासली नाविन्याने जनी । 
शोध एकाहुणी एक झाले ॥1॥
वायूवेगे जाती विमाने जोराने । 
आकाशी गमन करावया ॥2॥
तुकड्यादास म्हणे विद्युत निघाली । 
लाखो कामें झाली एकाएकी ॥3॥