पुष्पक विमान पुराणी ऐकिले
पुष्पक विमान पुराणी ऐकिले ।
प्रत्यक्ष पाहिले आता आम्ही ॥धृ॥
शोध लावणारे करिती कमाल ।
बुद्धिचे ते बल वाढवोनी ॥1॥
दिले देवे सर्व परी नेणे कोणी ।
आम्हा या वरुनी झाले ठावे ॥2॥
तुकड्यादास म्हणे जरी शांति नाही ।
व्यवहारी सर्वहि कामी पड़े ॥3॥