बहु संतीं केला जगा उपदेश । देश परदेश फिरोनिया ॥

बहु संतीं केला जगा उपदेश । 
देश परदेश फिरोनिया ॥धृ॥
परि नाही आले जनाचिये मना । 
भोगती यातना गर्भवास ॥1॥
विरळा पावला मार्ग परमार्थाचे । 
बोलके तोंडाचे घरोघरी ।।2॥
तुकड्यादास म्हणे पाहिजे सुकृत । 
तरी कृपायुक्त होय प्राणी ॥3॥