कांही संसाराच्या कांही वासनांच्या । कांहीक सुखाच्या वाटे गेले
कांही संसाराच्या कांही वासनांच्या ।
कांहीक सुखाच्या वाटे गेले ॥धृ॥
कांही विषयांच्या कांही हुंकाराच्या ।
कांहीक जारांच्या संगी गेले ॥1॥
कांही भोजनाच्या कांहीं शयनाच्या ।
काही उपाधीच्या लोकी गेले ॥2॥
तुकड्यादास म्हणे काय हो राहिले ?
प्रभु-भक्ति दिले वाट्या येणे ॥3॥