नलगे ही विषय-आशा, लागो ध्यास मज तुझा

(चालः किति उरली वेळ आता..)
नलगे ही विषय-आशा, लागो ध्यास मज तुझा ।
तोडी सकल कामना ही, माझी   श्रीगुरुराजा ! ॥धृ०।।
धाव रे श्रीहरी ! मज दीनाते उध्दरी ।
भव-सिंधु पार   करी,   फेक   हा   बोझा ॥१॥
बाळ ध्रुव का तारीला ? पाजि आजि प्रेम-प्याला ।
प्रल्हाद- स्तंभी गुरगुरला, लाविली ध्वजा ॥२॥
व्यास-वाल्मिकादी ऋषी । गुरु वसिष्ठा तत्त्वमसि I
देसी वस्त्र दौपदीसी, मीच   का   दुजा ? ॥३॥
आडकोजी ! पाहसी अंत । मांडियला हा प्राणान्त ।
नाही मज धीर धरत,   येई   मम   काजा ॥४॥
तुकड्यादास हा शिणलासे, फिरता गेली हो ! बहु वर्षे ।
कामक्रोध मायिक पिसे,   पुरे   ही   मजा ॥५॥