भव-नदिचा पूर आला, मन माझे भंगले ।

(चालः येशिल ना शेवटी तू गुरु..)
भव-नदिचा पूर आला, मन माझे भंगले ।
की वाटे प्राण जातो, सार्थक ना जाहले ॥धृ॥
अघटित हा जन्म आला, बह पुण्ये करुनिया ।
जाईल हे सर्व वाया गमवीता व्यर्थ   या ॥१॥
वाटे हो ! मना ऐसे, ही काया नासकी ।
पण  नाही दानधर्म द्यायासी आज   की ॥२॥
अंकित तो दास त्याचा, लिन झाला पाउली ।
तुकड्यासी ठाव देई, मागो हे माऊली ! ॥३॥