मन हे चंचल, स्थीर राहिना, का फिरवीसि मला ?
(चालः भजा भजा गुरुराज सर्वदा...)
मन हे चंचल, स्थीर राहिना, का फिरवीसि मला ?
शरण मी आलो गा ! तुजला ।।धृ०॥
फिरता फिरता बहुत श्रमोनी नरदेही आलो I
त्रिविधि तापांनी तप्त झालो l
बाळपणी मी खेळत असता वय सर्वहि गेले I
पुढे मन चंचल ते झाले ॥१॥
न मिळे कोणी सद्गुरु ऐसा चुकवि जन्म-मरण I
बहुत दक्षिणा नेति हरून II
हठयोगादी खटपट करुनी व्यर्थ फजित झालो I
धूम्रपानाने बहु शिणलो ॥२॥
अता तरी भवपार करी रे ! तुकड्या म्हणे बुडलो I
पुरे, चौऱ्यांशी बहु फिरलो ॥
क्लेश भोगिता या नरदेही श्रम झाले मजला I
शरण मी आलो गा ! तुजला ।।३॥