मनी आठवा गर्भवास तो, का झोपी गेले ?
मनी आठवा गर्भवास तो, का झोपी गेले ?
पुन्हा पुन्हा सांगतो, कसे रे ! या नर्की बुडले ? ।।धृ०।।
खेळ सुखाचा गोड वाटतो, आयुष्यापुरता ।
पुरता पुरता करिता झाला, दोरा ना - पुरता ।।१।।
काळ उभा फाडूनी मुखासी खाया धन आला ।
कधि नेइल उचलुनी, भरवसा नाही कोणाला ।।२।।
आम्हि सरोदी आजापासुन, सांगाया आलो ।
ऐका रे उघडुनी कर्ण ते, आम्हि अधिर झालो ।।३॥
तुकड्यादासा सद्गुरु साक्षी, चुकवा या घोरा ।
घोर नव्हे तो काळ आडवा आला उठ पोरा ! ॥४॥