धाव धाव स्वामिनी अंबिके !
(चालः कसा निभवसी काळ..)
धाव धाव स्वामिनी अंबिके ! का करिशी उशिर ?
त्रैतापाचा अग्नि चेतला, ब्रीद तुझे थोर ।।धृ०।।
आजवरी निभवला माय गे ! दास -परीवार ।
शरीर-गाडा विरला आता, दे आश्रय - थार ।।१।।
चिंता दुर्धर वेडी झाली, फिरते चह. देशी ।
काम-क्रोध फाकडे जाहले, आश्रय वेश्येसी ।।२।।
विवेक-सागर झोपी गेला, करि जागर त्याला ।
लोभाजीने आग लावली, साऱ्या शरिराला ।।३।।
तुकड्यादास म्हणे मनाजी, गडि माझा झाला ।
तुझ्या प्रसादे निर्भय तुकड्या, पदरी घे याला ।।४।।