आहे खरे पण दावु कसे ? आहे खरे

(चाल: जमुनातट राम खेले..)
आहे खरे पण दावु कसे ? आहे खरे ।।धृ०।।
रंग, रुपाविण काही दिसेना, न दिसे पण तो भास  वसे ।।१।।
द्रष्टा दृश्यहि एकचि होती, साक्षिपणाचा      ठाव    नसे ।।२।।
खूण-अखूणी एकचि भरला,अनुभव पाहता मन विलसे ।।३।।
जैसी गंगा - हृदयी लहरी, तैसी     स्फूर्तिरुपी     निरसे ॥४।l
शब्द निघेना, वृत्ति फुटेना, तल्लिन    मन   तारीच  घुसे ॥५॥
अंतर - बाहिर निर्मळ पाणी, जोचि दिसे  तैसाचि   वसे ।।६॥
तुकड्यादास भला स्वच्छंदी, आंधळियापणि डोळतसे ।।७।।