आवडली गुरुमाय ! हृदया
(चालः तू माझा यजमान..)
आवडली गुरुमाय ! हृदया ।।धृ०।।
तुच्छ दिसे धन - दौलत सारी, व्यर्थ भवाची हाय ॥१॥
नाम स्मरणा ध्यात रहावे, पटला हाचि उपाय ।।२॥
सत्संगतिविण पार मिळेना, मन हे तेथचि जाय ॥३॥
तुकड्यादास म्हणे यावाचुनि, नाहि कुणाला ठाय ॥४।l