फिरता का विषयी दिनरात ?

(चालः प्रभुविण कोण करिल भवपार.)
फिरता का विषयी दिनरात ? ।।धृo।।
विपय-मुखाला चाखुनि चाखुनि, होइल तनुचे खात ।।१।।
सुत-दारा-धन धरिता हृदयी,  बुडविल   गर्भ  घरात ।।२ll
काळ उभा केव्हाचा  डखरी,  बसला  वाट   पहात ।।३।।
साधूनिया घ्या सदगुरुसेवा,  तरिच    तराल   भवात ।।४।।
तुकड्यादास म्हणे या हो ! या, धरु सुजनाचा    हात ।।५।।