बघ डोळा उघडून, तापि गे !

बघ डोळा उघडून, तापि गे ! बघ डोळा 0।।धृ०।।
निर्भय होउनि जासि वनांतरि, सहन करित शित ऊन । तापि गे ! ॥१।।
काय कार्य तुज लगबगिचे हे ? खळखळसी तिकडून । तापि गे ! ll२ll
फोडुनि गिरि-पर्वत भूमीला, देसी कुणाचे ऋण ? तापि गे ! l।३॥
दास अम्ही तव भेट इच्छितो, पुरवी आस उठून । तापि गे ! ॥४॥
तुकड्यादास म्हणे तव पायी, मारगी प्रेम रडून । तापि गे ! ॥५॥