नाचु अम्ही हरिचे गुण गाता
(चालः गावो रिध सिध मंगल..)
नाचु अम्ही हरिचे गुण गाता, ठेवुनि त्या चरणावरि माथा ॥धृ०॥
काहि म्हणो कुणि, लोक ओक हे, सोडु न या जिविताच्या पंथा ॥१॥
जावो देह स्नेह ममतेचा, धावुनि धरु त्या लक्ष्मीकांता ॥२॥
सोडूनि लाज उदास जगी या रंगवू रंगि सदा गुणवंता ।।३॥
तुकड्यादास म्हणे हे करिता, प्राण निघो शेवटी हा आता ॥४॥