निर्भय पद आनंद निरंतर, स्मर मनुजा !

(चालः गावो रिध सिध मंगल )
निर्भय पद आनंद निरंतर, स्मर मनुजा ! निज वदनी हर हर ।|धृ०।।
स्वरुप सुखाचे आगर ज्याचे, ध्यानि भजा तो गिरिजा-शंकर ।।१॥
व्याघ्रासन आसन अधरासन, लाजत काम विकार निशाचर l।२।।
योगि -मुकुटमणि, वैष्णव बाणा, हाति त्रिशूल सदा डमरुधर ।।३॥
तुकड्यादास म्हणे ध्या रे ! मनि, देईल शांति उदात्त सुनिर्भर ।।४।।