दे हरी ! भेटी मला, मम प्राण
(चाल: क्यों नही देते हो दर्शन..)
दे हरी ! भेटी मला, मम प्राण व्याकुळ हा जाहला ॥धृ॥
सोडुनी मायबाप सारे, लागलो कासे तुझ्या रे !
त्यजुनि व्यवहारा जगाच्या, जीव तव द्वारीच आला ॥१॥
न रुचे माया-लोभ-आता, तारि येऊनि लक्ष्मीकांता !
दावि चरणा हे जगत्राता ! दास हा तव व्यर्थ गेला ।।२।।
भक्त बहु तव सृष्टिमाजी, धरिले का कवणे हृदया जी !
प्रेम- पान्हा पाजि - पाजि, देह चरणी वाहिलेला ॥३॥
गुन्हेगार मी तुझा खरा रे ! माफ करि-गुण अवगुण सारें I
देई तुकड्यासी आसरा रे ! काम-क्रोध तो बुडाला ।।४॥