धरु किती मी धीर हरी रे ! त्रास सोसवे ना ।

(चाल: कसा निभवसी काळ..)
धरु किती मी धीर हरी रे ! त्रास सोसवे ना ।
दूर करी गा ! यातुनि त्राता ! आलो तव   चरणा ।।धृ०।।
फिरता फिरता चौऱ्यांशी हे, उत्तम तनु आली ।
मानुज-जन्महि व्यर्थ जाय की, स्थिती अशी झाली ॥१॥
अपराधी मी पामर तुमचा, का हो ! दुर करता ?
त्यागिन प्राणचि आता चरणी   श्री   सदगुरुनाथा ! ।।२||
अंत पाहसी किती ? कंठ हा दाटुनिया आला ।
पाजी  पाजी  तुकड्यादासा   प्रभू !  प्रेम - प्याला ।।३।।