मन ना रमे हरि - पायी, करु काय सुचेना काही

(चाल: रमला कुठे ग कान्हा..)
मन ना रमे हरि - पायी, करु काय सुचेना काही ॥धृ०।।
तीर्थाटन करुनी आलो, बहु देश-विदेशी फिरलो ।
शांति जरा मुळि नाही ।। करु कारय 0॥१।।
एकांती बसलो ध्यानी, लावुनी समाधी स्थानी ।
परि चंचलपण ना  जाई ॥ करु काय 0ll२ll
बहु शास्त्रे वाचन  केले, कीर्तने-भजन ऐकिले ।
तरि बोध तयाला नाही ।। करु काय 0।|३।।
साधुच्या अखाडी गेलो, पंथ-मती वावरलो ।
शंका न मनाची  जाई ।। करु काय 0 ।।४।l
तुकड्या म्हणे काय करावे ? कोणाला काय पुसावे ?
सदगुरु विना गति  नाही ।। करु काय0।।५॥