भगव्या रंगिचा दुशेला, वाटे प्रिय त्या शिवाला

(चालः राधे ! इतुका कशाला..)
भगव्या रंगिचा दुशेला, वाटे प्रिय त्या शिवाला ।।धृ०।।
जातो गमता उतरे खाली, घेउनि शस्त्र कट्यारी भाली ।
गर्जे  व्याघ्र - गर्जनेला ।। वाटे0॥१॥
प्राणपरि त्या जपला रंगा, करुनि ठेवण्या त्यासि अभंगा ।
अंगी  रक्त  माखलेला ।। वाटे0।।२ll
समरांगण हे भगवे केले, धर्म राखण्या कष्ट सोसले ।
मिळवी देविच्या वराला।। वाटे0।|३॥
तुकड्यादास म्हणे वीरांनो ! आर्यपुत्र, क्षत्रिय शूरांनो !
ठेवा याद ही   तुम्हाला ।। वाटे0।|४।।