माझ्या प्रिय भारताशी, काहो ! धरिला अबोला

(चालः राधे! इतुका कशाला..)
माझ्या प्रिय भारताशी, काहो ! धरिला अबोला ? ॥धृ० ।।
कंस वधाया अपुल्या हाते, नष्ट करायासी असुरांते ।
तेव्हा धावुनिया  आला ॥ का होo ।।१।।
रावण वधण्या धावुनि गेले, वानरसेने करुनी अपुले ।
तेव्हा राखिले  ब्रिदाला ।। का होo ॥२।।
जव जव भक्त पडे संकष्टी, तव तव रक्षितसे जगजेठी ।
पुरवी  वस्त्र  द्रौपदीला ।। का होo ।।३॥
परवशतेच्या काज कपाटी, अन्नावाचुनि मरती पोटी ।
कैसे दिसेना तुम्हाला ? ।। का हो0l।४।।
दीन अता हे भारति झाले, आठवती तव शब्द मागले ।
येतो   धर्म - रक्षणाला ।। का हो0 ॥५।।
वेळ किती उरलीसे आता ? प्राण निघो पाहे आकांता ।
या हो ! शांतवा अम्हाला ।।का हो0।।६।।
स्फूर्ती द्या तरुणांसी ऐसी, उद्धरु मायभूमि ही कैसी ?
जातो धर्म  हा   लयाला ।। का हो0 ॥७॥
तुकड्यादास म्हणे यदुराया ! प्रगट करा ती अंतर्माया ।
दावा   शक्तिचा   उजेला ।। का होo।|८।।