भारत हे प्रीय ज्याला, तो श्याम बंसिवाला ।
(चाल- भारत में फिरके आजा..)
भारत हे प्रीय ज्याला, तो श्याम बंसिवाला ।
दिसला का हो ! कुणाला, तो श्याम बंसिवाला ? ।।धृ०।।
सहकारी पांडवांचा, जिवभाव द्रौपदीचा ।
गमला का कुंजनाला, तो श्याम बंसिवाला ? ॥१॥
बंसी मधूर ज्याची, जी जीव गोपिकांची ।
रुसला का हो ! अम्हाला, तो श्याम बंसिवाला ? ।।२।l
ती माळ वैजयंती, पाहताचि देत शांती ।
हसला का मोहिताला, तो श्याम बंसिवाला ? l।३॥
अधरी धरीत पावा, दे योगिया विसावा ।
बसला का काननाला, तो श्याम बसिवाला ? ॥४॥
सांगा निरोप माझा, भारत पहा म्हणा जा ।
भुलला का या दिनाला, तो श्याम बंसिवाला ? ॥५॥
तुकड्याचि आस ऐसी, ती वेळ येइ कैसी ?
वश झाला का दुजाला, तो श्याम बंसिवाला ? ॥६॥