मी तो अधमचि, काय वर्णु गुण ?

(चाल: यहाँ वहाँ क्या कहां भी..)
मी तो अधमचि, काय वर्णु गुण ?
तुझे     दयाळा       रामराया ! ॥धृ०॥
नाही मज बा ! जननी - जनिता ।
शिणली बहुतचि भवि या फिरता ।
करी कृपा मज, तुजसि स्मराया । तुझे दयाळा० ॥१॥
घेई पदरी  मजसि    तत्वता I
रज- तम - सत्त्वा तू बा ! हर्ता I
करि करुणा   येउनिया    हृदया । तुझे दयाळ ० ॥२॥
तुकड्यादास शरण तो आला ।
पाजी मज प्रेमाचा प्याला ।
दास   तुझा   हा   जाईल   वाया । तुझे दयाळा 0॥३॥