ये धावत सखया रामा ! भक्त-विश्रामा ! पूर्ण दयाळा !

(चालः गर्भिणी होति एक हरणी..)
ये धावत सखया रामा ! भक्त-विश्रामा ! पूर्ण दयाळा !
का नये दास - कळवळा ? ॥धृ०ll
सोसिता आपदा बहू , धीर किति ठेवू ? त्रास बहू झाला l  
रे  गरूडावर भेटिला ॥
सोडूनी प्रपंच स्थान धरियेले चरण, वाटते भीती l
अंति काय होईल   स्थिती ?
राहसी जरि क्षिरसागरी हो !
येउनिया मजला तारी   हो !
गरुडावर करुनी स्वारी हो !
हे प्रभु ! रक्षि या बाळा । का नये दास ।।१।।
ही माया दुस्तर सारि, फोडि हुंबरी सोडविल कोण ?
की त्यजू  आपुला    प्राण ?
आला द्रौपदिचे  कामा   हो !
नेली गणिका निजधामा हो !
उध्दरलि अहिल्या रामा हो !
दाविला मार्ग जरि गुरुनं, तुजला स्मरुन, हरुन बाषकळा 
तुकडयादासा     तारि      घननिळा ! ॥२॥