माझी विनवणी, तुम्हा चक्रपाणी !

(चालः धन्य तव करणी, करणी..)
माझी विनवणी, तुम्हा चक्रपाणी !
त्रास    सोसवे    न    जगदानी !
कृपाळू खरे, हरि ! आत्मज्ञानी ।
रमवा चित्त  गुरु - चरणी ॥धृ॥
करा हो ऐसे, नेयेचि वृत्तिवरी ।
चुकवा    चौऱ्यांशी - फेरी ।।
काय मी मागू ? तुम्हास गिरिधारी  !
अशाश्वत माया ही   सारी ॥१॥
हे जगडंबर, नको मला आता ।
ठेवा   चरणि   जगन्नाथा ।।
काम-क्रोध ना, लागु देति पंथा ।
ब्रीद पाळा हो जग- त्राता ! ॥२॥
भक्त राखिले, महान्त संकष्टी ।
करा हो  ! प्रेमाची     वृष्टी ।।
तुकड्यादास, झालासे कष्टी ।
फिरवा     करुणेची   दृष्टी ॥३॥