भक्त - कामना - कल्पद्रुम तू राया !

(चालः उठ जागा हो, का निजला ..)
भक्त - कामना - कल्पद्रुम तू राया  !
का लाविलिस ही माया ? ॥धृo॥
भय वाटतसे, कधी भेटसी त्राता !
पाहसी अंत किति आता  ?
बा ! वद - वदता कंठहि सगळा सुकला ।
हरि ! नये दया का तुजला ?
सोडुनिया    भव - घर l
नामी तुझिया रतलो रे !
परि दुर्भागी बनलो रे !
बा ! देइ अता    प्रेमचि    भजने   गाया । का लाविलीस ।।१II
नलगे मज हो  ! प्रपंच वा घरदार ।
गाईन सदा हरिहर ।।
मन चंचल हे, स्थीर करी गा  ! माझे ।
श्री स्वामी ! उचली ओझे ।।
ओरडू किती मी आता ?
ये दया न तुज भगवंता !
ठेवि रे  ! हस्त तरि माथा !
ब्रिद राखी गा  ! राखी मजला सखया ! का   लाविलीस o॥२॥
शिशुपण गेले खेळण्यातसे माते !
ना बोध दिला कुणि संते ।।
दारिद्रि अशी पहा अवस्था माझी !
ठेविता अशी ही का जी ? ॥
त्यागीन अता मी प्राण I 
श्रीहरी ! न दाविसी चरण |
रे ! खचित गळ्याची आण ।
मिळुनिही  पहा   सुंदर    योनी   वाया । का लाविलीस 0 ॥३ll
तुज नव्हते का दुसरे घर देण्याला ?
अपघाति    जीव    धाडियला ।।
इकडे -तिकडे नाही, मध्ये रडतो ।
बा  ! नामी तुझे ओरडतो ।।
पाहुनि धावा बाळाचा l
करि दया हरी रे  ! साचा ।
नको संग अशाश्वत याचा ।
बा ! तुकड्या तो बुडतो,    घेई   पाया । का लाविलीस 0 ॥४॥