ये इकडे, मज घे पदरी तू , सखया रामा !

(चालः अपने आतमके चिंतन..)
ये इकडे, मज घे पदरी तू , सखया रामा  ! धाव त्वरे ।
दास-फजीती जाणुनी आता, अंत कितीतरि बघतो रे ! l।धृo॥
नसे कुणाचा संग मला गा  ! न धरी पदरी कुणि राया ।
भक्त - काम - कल्पद्रम जाणुनि आलो शरण तुझे पाया ॥१॥
तव नामे किति तरले पापी, पुढेहि तरती मज वाटे I
हाच दास का तुझा दरिद्री  ? घे  पदरी,   गुण   दे   मोठे ।।२॥
तुकाराम वा रामदास ते अगणित तारुनि नेसी रे  !
स्मरण करिल तूकड्याची वाचा, जरि वरदान तू देसी रे ! ॥३॥