येउ दे दया रामराया ! शरण मी आलो तव पाया

(चालः धन्य तव करणी..)
येउ दे दया रामराया ! शरण मी आलो तव पाया ॥धृ०॥
दरिद्रे पिडलो, बहुभारी  ! तुजविण कोण मला तारी  ?
बाप तू जननी,अमुची प्रभुराया ! चरणी झिजविन ही काया ॥१॥
तुजविना कोणी नसे पांडुरंगा ! ध्यान मज आवडिने सांगा ।
तोडि जन्माची व्यथा लक्ष्मीकांता ! ठेवितो चरणी मी माथा ॥२॥
तुकडयादास सदा विनंति करी ! प्रसाद द्यावा हो श्रीहरी !
कृपेचा हात प्रभुरे ! ठेवि शिरी I चुकवी जन्म - मरण फेरी ॥३॥