मागणे तुला हे स्वामी ! बुध्दि देइ अंतर्यामी
(चालः असं वेड लावशिल कधी..)
मागणे तुला हे स्वामी ! बुध्दि देइ अंतर्यामी ॥धृ०॥
तोड़ी या विषय -विकारा । येरझार चुकवी फेरा ॥१॥
बहू शिणलो फिरता-फिरता । श्रीहरी उध्दरी आता ॥२॥
मज त्रास बहु झाला जी ! द्या नामामृत-प्याला जी ! ॥३॥
तुकड्या शरणागत पाही । मज ठाव आज दे पायी ॥४॥