दुर्जन तो पुण्य न करी या हाते

दुर्जन तो पुण्य न करी या हाते । करिता कोणाते करो नेदी ॥धृ॥
निंदा भक्ति त्याची मत्सर ते ज्ञान । सदा मद्यपान समाधी ही ॥1॥
धनासाठी प्राण देई कुंभपाकी । गावामध्ये नाकी नऊ आणी ॥2॥
तुकड्यादास म्हणे पावतील अंतीं । प्राण यमाहाती जाय बळे ॥3॥