मान मिळावया पुढे पुढे करी
मान मिळावया पुढे पुढे करी ।
दुःख होता दुरी पळुनी जाय ॥धृ॥
खोटे खरे कांही बोलुनिया लोकां ।
पाडितसे धाका आपुलिया ॥1॥
क्रूरता दावोनी द्रव्य लुबाडावे ।
पूर्ण राहे ठावे मूर्ख लोका ॥2॥
तुकड्यादास म्हणे भरतील पाप ।
कळे आपोआप तयालागी ॥3॥