उदर पोषण हेचि जयाचे जीवन

उदर- पोषण हेचि जयाचे जीवन ॥
विषय भोगणे । हेचि जयाचे रंगणे ॥
निंदा स्तुती वाक । हेचि जयाचे कौतुक ॥
तुकड्या म्हणे तया । पाहो नये नेत्राने या ॥