न्यायी शत्रू बरा अन्याय दाखवी
न्यायी शत्रु बरा अन्याय दाखवी ।
आपुलिया भावी कटू वाटे ॥धृ॥
अन्यायाचा मीत्र जरि जीवलग ।
जाणावा घातक निश्चयाने ॥1॥
न्यायी शत्रुवरी पूर्ण करा प्रेम ।
त्याचे पड़े काम अंतःकाळी ॥2॥
असत्याच्या सवे पावाल आपदा ।
तेथे नाही कदा सुख पावे ॥3॥
तुकड्यादास म्हणे गुरु न्यायी खरा ।
दाखवी अंधारा-उजेडाते ॥4॥