मना संग धरी ऐसिया जणांचा
मना ! संग धरी ऐसिया जनाचा ।
जेणे विषयांचा भाव नाशे ॥धृ॥
परमेश्वरी प्रेम राहे सांठवोनी ।
ऐसिया कीर्तनी जाय वेगे ॥1॥
उचंबळे प्रेम ऐकाया वचन ।
जेणे समाधान होय सदा ॥2॥
तुकड्यादास म्हणे न सोडी तो संग ।
चढे ज्याने रंग हरिनामाचा ॥3॥