दुजिये नोहे समाधान I
दुजिये नोहे समाधान । तुम्हा देखिल्या वाचून ॥ धृ ॥
अगा पंढरीच्या देवा ! । रूप दाखवी केशवा ! ॥ १ ॥
येई माझ्या हृदयस्थानी । तुझ्या रंगू दे रंगणी ॥ २ ॥
तुकड्या म्हणे मेघश्यामा । तुझ्याविण कोण आम्हा ॥ ३ ॥