येगा! एकांती विठ्ठला I
येगा! एकांती विठ्ठला । जीव भेटाया भुकेला ॥ धृ ॥
अंतरंग सिंहासन । बैसलोसे मी मांडून ॥ १ ॥
चित्त- नंदादीप जळे । त्याचे तुम्हाकडे डोळे ॥ २ ॥
तुकडया म्हणे द्या दर्शन । स्वरुपी मिळवा जीवप्राण ॥ ३ ॥