नको मित्रता नि नको शत्रुता
( चाल - क्या मिल गया है , क्या खोगया )
नको मित्रता नि नको शत्रुता ,
मी बरा एकटा आपुल्याशी अता !
अम्ही चांगले , सर्वची चांगले हे ,
असा हाची प्रेमा जडला अता ॥धृ०॥
जगाची प्रिती , मोहते - भोवते हे ,
तशी संगती जोडते - मोडते हे !
नकोसे म्हणो , परी न भंगते हे ,
करू त्याग तरी अंतरी रंगते हे ! | ॥१॥
राहावे वना , परी न येता मना ते ,
करावे जपा , क्रोध वाढे दुणा ते ।
करावी कुणी , साधना - वंदना ते ,
अभिमान वाढे , अतिसा मनाते ! ।।२।।
पुराणे कुठे चालती ऐकुया ते ,
परी भावना फिरविते , तोडी नाते ।
म्हणे दास तुकड्या , नका मागुता ते ,
जडली जडू द्या ती एकात्मता ते ॥३॥