माझ्या श्यामला कोमला !
माझ्या श्यामला कोमला! । ऐसा का रे रागावला? ॥ धृ ॥
काय आम्ही तुझे केले ?। सांग कोणा दुःखविले ? ॥ १ ॥
तुझ्या भक्तांचाहि छळ । कोठे झाला का सढळ ? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे का न येशी । आजी कृष्णा ! तू ध्यानासी ॥ ३ ॥