नको घेऊ देवा ! भार I
नको घेऊ देवा! भार । यावयाचा गरुडावर ॥ धृ ॥
पहा तेथोनिया दासा । आम्हा आहे भरवसा ॥ १ ॥
सर्व तुक्ष्या कृपे चाले । जे जे आमुच्याने झाले ॥ २ ॥
तुकड्या म्हणे घडो सेवा । ऐसा आशिर्वाद द्यावा ॥ ३ ॥