दुर्गा सिंहावरती स्वार ! कराया दुष्टांचा संहार ! !

( चाल : सरपे टोपी लाल . . ) 
दुर्गा सिंहावरती स्वार ! कराया दुष्टांचा संहार ! ! 
धरी तरवार करी ! 
शक्तीचा संचार करुनिया .भक्तांचा सत्कार ।। 
महा उपकार करी ! ॥धृ॥ 
रत्नजडित शोभे कांति , दिव्य तेज मुकुटावरती
फाकली प्रभा ती भोवती । 
दर्शनात वाटे शांति ! दूर होई भीति - भ्रांति । 
करी कामनेची पूर्ति । 
रिता तव आधार , उध्दरी भक्तांचा संसार । 
धरी तरवार   करी ! ॥१॥ 
लाल कुंकू मळवट भाळी , पिंताबराची कंचोळी । 
पीत वस्त्र अंगी सगळी ! 
द्वारि पुष्प - वेली - डाळी । दारि शोभल्या रांगोळी । 
धूप - दीप जळती सगळी ! 
वंदी तुकड्यादास , लागू दे तव सेवेचा ध्यास । 
धरी  तरवार   करी ! ॥२॥ 
                            रेल्वे प्रवास , मुंबई दि. २०-१०-१९५९