प्रभू माझा पूर्ण विसावा ।
( चाल : डोळे मोडीत राधा चाले . . . )
प्रभू माझा पूर्ण विसावा ।
त्या स्मरीन सदा जिव - भावा हो ! llधृ०॥
क्षणिक सुखाचे धन जन सारे,स्री-पुत्रादिक गण - परिवारे ।
हा देती संत पुरावा हो ! ॥ प्रभू माझा० ॥१॥
सगळे जन हे पाहती सुखाला , परि सुखमार्ग कळे न कुणाला
म्हणुनी हा मंत्र जपावा हो ! ।। प्रभू माझा० ॥२॥
देहादिक हे अणिकचि साथी , जन्मोजन्मी प्रभू सांगाती । ओळखुनिया तो घ्यावा हो ! | | प्रभू माझा ॥३॥
तुकड्यादास म्हणे प्रभु स्मरणे , चुकविल मग चौऱ्यांशी धरणे
भवसागर पार कराया हो ! । । प्रभू माझा० ॥४॥