मूर्खा ! निजगुज पाही,अजुनी का फिरसी वाया रे

(चालः दीनदयाळा रामा ! कामा..)
मूर्खा ! निजगुज पाही,अजुनी का फिरसी वाया रे ! ॥धृ0॥
संकट पडता ओरडसी मग, नाहि यमासि दया रे !
सोडूनि नश्वर शाश्वत पाही, ब्रह्मरुपि जाया रे !
अजुनी का फिरसी  0।I१।।
उघडी उघडी झापड अजुनी, वय झोपेतचि गेले ।
योगाभ्यासी होसि जरी तू, प्रभु ये पदि न्याया रे  !
अजुनी का  फिरसी 0॥२॥
प्रेमे सद्गुरु वश करुनीया छत्र दयेचे मिळवी ।
तुकड्यादास म्हणे तरि तरशिल, सोय धरी सखया रे !
अजुनी का  फिरसी 0॥३॥