मिळुनि अशी ही सुंदर योनी, का गमविसि वाया रे !

(चालः दिनदयाळा रामा ! कामा..)
मिळूनि अशी ही सुंदर योनी, का गमविसि वाया  रे ! ।।धृ०।।
पाठविले तुज जाणुनि देवे, स्वहिता मुकसी का रे !
घडि-घडि पल-पल वय हे गेले,जाशिल यमद्वारा   रे ! ।।१।।
सेवुनि पाच विषय तू भ्रमसी, त्वंपद ते पाही रे !
तू कोण हे सत्य शोधुनि काढी, अमोल ही   संधी   रे ! ॥२।।
जैसी स्थिति मायगर्भात होती, ध्यान सोडिले का रे !
श्री आडकुजी-अंकित तुकड्या, वदे स्वस्थ हो बा रे ! ।।३।।