देह की भोगिता त्याचा अससी सखया ?

(चालः कार्तीक पौर्णिमा रम्य निशा ..)
देह की भोगिता त्याचा अससी सखया ?
हे जववरि न कळे तुजला, जाशिल  वाया ॥धृo।।
कर विचार अपुले मनी सत्य शोधाया ।
नश्वर हा भव संसार तोड ही माया ।।
तुज नसे दया, का निष्ठूर करिसी काया ।
का उपाय करिसी गड्या ! यमाघरि   जाया ॥१॥
सांगेन तुला मी उपाय आता सोपा l
धरुनिया श्रीगुरू - चरण सोडि या पापा ॥
आडकोजी - अंकित तुकडया सांगे नमुनी ।
सर्वाहूनि सखया ! गुरु - पद श्रेष्ठचि भुवनी ॥२॥