मिळाली नरतनु अवचीत l अवेळी होइल रे !
(चालः गडे हो ! कृष्ण गडी अपुला.. )
मिळाली नरतनु अवचीत l अवेळी होइल रे ! अंत ॥धृ॥
त्रासला फिरुनी बह योनी । फेरे चुकवी रे ! अजुनी ।
तारितिल तुजला ते संत । अवेळी ०॥१॥
सेविता विषय गमे गोड । योनी भोगिसि बहु द्वाड ।
समज धरि,विचार करि त्वरित । अवेळी 0॥२॥
नसे गुरुविण थडी तरण्याला । मूर्खा ! अविचारी बनला।
झाडतिल हंटर यमदूत । अवेळी 0 ॥३॥
नमुनि ओरडू किती आता ? शरण जा श्रीसद्गुरुनाथा ।
प्रेमे तुकड्या तो वदत । अवेळी 0 ॥४॥