मुखी ज्ञान परी कर्म हे वोखटे
मुखी ज्ञान परी कर्म हे ओखटे ।
कैसे बंध सुटे संसाराचे ? ॥धृ॥
जे जैसे बोलावे ते तैसे चालावे ।
संतांचे लक्षावे लक्षण हे ॥1॥
हळुहळू गावे मनाशी रंगावे ।
संतसंगी पावे सर्व सुख ॥2॥
तुकड्यादास म्हणे पहावा इतिहास ।
करावा अभ्यास त्याचि पंथे ॥3॥