देव सर्वसाक्षी बाहेरी अंतरी

देव सर्वसाक्षी बाहेरी अंतरी । 
करावया चोरी जागा नाही ॥धृ॥
धरावा विश्वास दृढ़ मनामाजी । 
पडो नये काजी पापाचरणी ॥1॥
सुखवावे मना विचारे अंतरी । 
दावोनिया थोरी सत्पुरुषाची  ॥2॥
तुकड्यादास म्हणे शास्त्रांचे पठण । 
घ्यावे विश्वासून गुरुमार्गी ॥3॥