कर्मकांडी वेद आहे त्रीगुणात्मक
कर्मकांडी वेद आहे त्रिगुणात्मक ।
जाणावे निःशंक गुरुबोधे ।।धृ।।
कोणत्या उपाये कोण रोग जाय ।
कोणतिया काय शिक्षा कीजे ।।1।।
पापपुण्य यांची करिती तुलना ।
शोधुनिया नाना अंतरंग ।।2।।
तुकड्यादास म्हणे तारक मारक ।
अधिकारे हांक देई वेद ।।3।।